बंडुभाऊ निंदेकर वणी:-
आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोज शनिवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तेजापूर येथे तालुकास्तरीय महादीप परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हास्तरीय फेरीकरिता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
संजना हेमंत मोहितकार व प्रणय जगदीश गिरसावळे हे विद्यार्थी जिल्हा स्तरीय फेरीकरिता पात्र झाले त्या बद्दल त्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.किशोर चहांदे सर हे होते. विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख श्री.राजेश खुसपुरे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालयाचे शिक्षक श्री नयन नंदूरकर सर , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री प्रविणभाऊ मालेकार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री प्रकाशभाऊ बावणे, सौ शालूताई पानघाटे, श्री अरविंद मालेकार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन पिंपळकर सर यांनी केले व आभार कु संजीवनी पेंदोर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु.गंगेश्वरी गिरसावळे यांनी मदत केली. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून करण्यात आली.