*यात्रा मैदानावर भंगार दुकानदारांचे अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला टाकले भंगार, अपघात होण्याची शक्यता,न.प.अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष *
वणी :-रंगनाथ स्वामी चौक ते जंगल पिर मार्गावर अनेक भंगार व्यवसाय करणाऱ्यांची दुकानें आहे.या दुकानदारांनी नगर परिषद चे जागेवर अतिक्रमण करून दुकानें थाटली आहेत.त्या दुकानात विक्रीसाठी आलेल्या भंगार ते चक्क रस्त्यावर टाकतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आपण नेहमी पाहतो आहे की एखाद्यी घटना घडली की तेव्हा प्रशासनास जागं होतं व नंतर कारवाई करण्यात येते पण त्यापुर्वी कांहीच करतं नाही येथिल प्रशासन यांची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे मुंबई येथील होर्डींग्ज प्रकरण हे मोठे उदाहरण आहे.त्या होर्डींग्ज खाली दबून अनेकांना अपंगत्व आले अनेकांनी आपला जीव गमावला लागला तेव्हा प्रशासनास जाग आली व शहरातील अनधिकृत होर्डींग्ज चे सर्वेक्षण करण्यात यावे असे निर्देश महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यास दिल्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्वेक्षण करण्यात आले व अनाधिकृत होर्डींग्ज वर कारवाई करण्यात आली.वणीतील पालिका प्रशासन एखाद्या अपघात होण्याची प्रतीक्षा पहात आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तेव्हा लवकरात लवकर हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात यावी तसेच या अतिक्रमण करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई यावी अशी मागणी नागरिकां कडून करण्यात येत आहे