वणी :
शहरातील गोकुल नगर येथील तरुण गणेश संजय भोयर हा गुरुवारी दिनांक ९ मे २०२४ ला सायंकाळी ४:०० नंतर घरी कोणालाही न सांगता बाहेर निघुन गेला आहे. कुटुंबीय गणेश यांचा शोध घेत आहे, परंतु अजूनही गणेश यांचा शोध लागला नाही. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून कोणालाही गणेश कुठे आढल्यास किंवा दिसल्यास किंवा त्याच्या संबंधित कुठलीही माहिती मिळताच 9623203675, 9021384942 या मोबाईल क्रमांकावर कळवावी, अशी विनंती गणेश यांचे भाऊ मंगेश विजय भोयर यांच्याकडून करण्यात आली आहे.