वेकोली निलजई येथे कार्यरत जि एन आर प्रा.ली.कंपनी हि कोळसा उत्खनन करते या कंपनीमध्ये बाहेरील राज्यातून कामगार आणुन त्यांना कामाला ठेवण्यात येत परंतु स्थानिक कामगारांना मात्र कामांपासून वंचित ठेवण्यात आला आहे खरतर या ठिकाणी येथील स्थानिक भूमिपुत्रांचा प्रथम अधिकार आणि हक्क आहे. परंतु त्यांना सदर कंपनी रोजगारापासून वंचित ठेवत आहे.
त्यामुळे सदर विषयात आपण स्वतः लक्ष घालून येथील युवकांना रोजगार देण्याची ताकीद कंपनीला द्यावी, व येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यातून होणाऱ्या सर्व परिणामास आपण राहाल असा सज्जड दम निवेदनातून सब एरिया मॅनेजरला देण्यात आला आहे याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व मनसैनिक हजर होते