वणी :-
विदर्भ पटवारी संघाची 55 वी वार्षिक आमसभा दि.18 मे 2024 रोजी वणी येथील वसंत जिनींग हॉल येथे श्री. राजुभाऊ मानकर, जिल्हाध्यक्ष, वि.प.संघ, यवतमाळ यांच्या अध्यतेखाली पार पडली. त्यामध्ये नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पदी राजु मानकर (सलग तिसऱ्यांदा निवड), उपाध्यक्ष परीमल डोळसकर, सचिव भरत पिसे (सलग तिसऱ्यांदा निवड), सहसचिव राहुल माहुरे तर कोषाध्यक्ष म्हणुन प्रकाश कानडे हे निवडुन आले.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, कें. सरचिटणीस संजय अनव्हाणे, कें. उपाध्यक्ष प्रकाश सुर्वे , कें. कोषाध्यक्ष विजय बोराखडे व के.सहसचिव गजानन भागवत हे उपस्थित होते, निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री नंदकिशोर माहोरे यांनी काम पाहिले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी उपविभागाचे अध्यक्ष नितेश पाचभाई ,सुत्रसंचालन सुनील उराडे यांनी तर आभार राहुल माहूरे यांनी व्यक्त केले. आमसभेच्या यशस्वीतेसाठी उपविभागाचे अध्यक्ष नितेश पाचभाई यांचे नेतृत्वात , सचिव सत्यानंद मुंडे, उपाध्यक्ष मुकेश इंगोले, सहसचिव विशाल मोहितकर, कोषाध्यक्ष विक्रम घुसिंगे तसेच वणी उपविभागातील तलाठी यांनी परीश्रम घेतले.
वणी येथे विदर्भ पटवारी संघाची वार्षिक आमसभा संपन्न वणी :-विदर्भ पटवारी संघाची 55 वी वार्षिक आमसभा दि.18 मे 2024 रोजी वणी येथील वसंत जिनींग हॉल येथे श्री. राजुभाऊ मानकर, जिल्हाध्यक्ष, वि.प.संघ, यवतमाळ यांच्या अध्यतेखाली पार पडली. त्यामध्ये नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी राजु मानकर (सलग तिसऱ्यांदा निवड), उपाध्यक्ष परीमल डोळसकर, सचिव भरत पिसे (सलग तिसऱ्यांदा निवड), सहसचिव राहुल माहुरे तर कोषाध्यक्ष म्हणुन प्रकाश कानडे हे निवडुन आले. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, कें. सरचिटणीस संजय अनव्हाणे, कें. उपाध्यक्ष प्रकाश सुर्वे , कें. कोषाध्यक्ष विजय बोराखडे व के.सहसचिव गजानन भागवत हे उपस्थित होते, निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री नंदकिशोर माहोरे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी उपविभागाचे अध्यक्ष नितेश पाचभाई ,सुत्रसंचालन सुनील उराडे यांनी तर आभार राहुल माहूरे यांनी व्यक्त केले. आमसभेच्या यशस्वीतेसाठी उपविभागाचे अध्यक्ष नितेश पाचभाई यांचे नेतृत्वात , सचिव सत्यानंद मुंडे, उपाध्यक्ष मुकेश इंगोले, सहसचिव विशाल मोहितकर, कोषाध्यक्ष विक्रम घुसिंगे तसेच वणी उपविभागातील तलाठी यांनी परीश्रम घेतले.