वणी-
सरकारने OBC(VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करावी तसेच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यासह इतर 18 मागण्या घेऊन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी, मारेगाव, झरी, जि यवतमाळ च्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर “ओबीसी एल्गार मोर्चा” चे रविवार, दि. 11 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 12.00 वाजता आयोजन केलेले आहेत. अशी माहिती गुरुवारी सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
मागील अनेक वर्षापासून केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही प्रमुख मागणी जातनिहाय जनगणना कृती समिती करील आहे परंतू आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तसेच मराठा समाजाच्या दबावापुढे झुकून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा सरकारने घाट घातला आहे. ही बाब ओबीसीसाठी अन्यायकारक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतमजूर शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारी कर्मचान्यांचे विविध प्रश्न घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहेत, तरी OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील विविध जातसमूहाने आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी आणि सामाजिक हितासाठी लाखोंच्या संख्येने मुलाबाळासह, सहकुटुंब सहपरिवार आप्तस्वकीय, नातेवाईक व मित्रमंडळीसह एल्गार मोच्योत सहभागी व्हावे, असे आवाहन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहेत. मोर्थ्याची सुरुवात व समारोपसुद्धा शासकीय मैदान, पाण्याच्या टाकीजवळ, वणी येथेच होणार आहेत आणि समारोपानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन सभेला प्रसिध्द वक्ते तथा ओबीसी विचारवंत मा. प्रा. डॉ लक्ष्मण यादव, दिल्ली हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर ओबीसी शिष्टमंडळातर्फे मा. उपविभागीय अधिकारी, वणी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहेत.
हा एल्गार मोर्चा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही एका सघटनेचा नसून आपल्या ओबीसी समाजाच्या न्याय, हक्क-अधिकारासाठी असून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहेत, याची सर्व OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाजबांधवानी नोंद घ्यावी, असे आवाहन “ओबीसी एल्गार मोर्चा च्या आयोजकांनी केलेले आहेत.