सविनय वृत्त आहे की मच्छिंद्रा युवा शेतकरी पांडुरंग दत्तात्रय शेडामे यांच्या घराशेजारी गुलाब हरी वडस्कर , सुधाकर महादेव सोनटक्के, उमेश गुलाब राव क्षिरसागर ऋषी गोपाळ मत्ते यांचे घर आहे
पुर्वी तक्रारकर्ता पांडुरंग यांची बैलगाडी घरापर्यंत जात होती परंतु वरील गैर अर्जदाराने अतिक्रमण केल्याने शेतीचा व इतर माल डोक्यावर घेऊन बैलबंडीत ठेवावा लागतो.
हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे याचा मनस्ताप युवा शेतकऱ्याला व त्याचे परीवाराला होत आहे.
याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्री नारायण गोडे यांच्या सहकार्याने तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आली आहे तसेच मा.जिल्हाधिकारी यवतमाळ वणी येथे आले असता यांना सुद्धा देण्यात आली आहे .या तक्रारींची प्रत जिल्हा परिषद यवतमाळ,उपविभागिय अधिकारी वणी यांना सुद्धा देण्यात आली आहे.