वणी:- वणी विभागात रेती तस्करी ला उधाण आले आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हे माफिया अव्वाच्या सव्वा दराने भर दिवसा शहरात व इतरत्र विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील प्रमुख व अंतर्गत रेती भरलेले ओव्हरलोड ट्रक भररस्त्याने फिरताना दिसत नाही याचं नेमकं कारण काय?
शासनाने रेतीचा उपसा, वाहतूक तसेच साठवणूक करणे करीता ऑनलाईन टेंडर बोलविल्यागेले त्या न परवडणारे दर कंत्राटदारांनी टाकले त्यामुळेच कंत्राटदारांवर थेट शंकेची सुई त्याचं वेळेस रुचली .डेपो हा केवळ तस्करांचा अड्डा झाला आहे
शासनाचा हा प्रयोग फसल्यात जमा झाला आहे तर तस्कारासाठी नवसंजीवनी ठरते आहे विविध शकला लढवुन चलाखी करून अवैध वाहतूक करीत आहे
इमानदार ट्रॅक्टरमालक ,चालक व मजूरजं देशोधडीला लागले उपासमारीची वेळ आली आहे, तसेच वाहनांचे हप्ते कसं भरायचे हा प्रश्न पुढं उभा आहे रेती तस्करीला वेळीच आवर घाला
शासनाने येत्या १०दिवसात या वर आळा न घातल्यास ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोसिएशन तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारेल असे निवेदनातून इशारा दिला आहे
निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव महसूल मुंबई,विभागीय आयुक्त अमरावती, पोलिस आयुक्त अमरावती, पालकमंत्री यवतमाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ, आमदार वणी, उपविभागीय अधिकारी वणी, उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, ठाणेदार वणी ला दिली आहे
तहसीलदार निखिल धुळधर:- मला आज तुमची तक्रार प्राप्त झाली आहे,यावर त्वरित कारवाई सुरू करेल असे समजा.यामागिल सत्य मी लवकरच शोधून काढेल.तसेच आँनलाईन बुकिंग फक्त वणी विभागातील सेतू सुविधा केंद्रातुन होईल .
आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार:-.मतदार संघातील लोकांना काम मिळतं नसतील तर या योजनेचा फायदा काय?
त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन करून खडसावले .
मला थोडा वेळ द्या मी तुमच्या सोबत आहे .तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणे हि माझी जबाबदारी आहे